Monday, December 28, 2009

क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्का
के.के.एम. महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. साहेब खंदारे यांच्या ‘मराठय़ांचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास’ च्या पहिल्या खंडास राज्य सरकारचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . या निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश क्षीरसागर होत्या. प्रमुख पाहुणे पाथरीचे न्यायाधीश क्षीरसागर, सेलूचे न्यायाधीश भाकरे, ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव सोळंके उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव खारकर, वाघ, कांबळे, उदावंत यांचाही सत्कार करण्यात आला ,

Sunday, December 27, 2009

राज्य सरकारचे सन 2008-09 चे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार जाहीर
डॉ. साहेब खंदारे (मराठ्यांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास खंड-1)
ज्ञानेश महाराव (जिंकू या दाहीदिशा)

मुंबई - राज्य सरकारचे सन 2008-09 चे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार आज येथे जाहीर करण्यात आले. पुरस्कार प्राप्त लेखकामध्ये डॉ. जनार्दन वाघमारे,विश्वास पाटील (नॉट गॉन विथ द बिंड),सदानंद देशमुख, राजा कदम (अवशेष) ,ज्ञानेश महाराव (जिंकू या दाहीदिशा), डॉ. सतीश साळुंके (अवस्थतरीही),डॉ. साहेब खंदारे (मराठ्यांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास खंड-1) आदींचा समावेश आहे. सांगली येथे 14 फेब्रुवारी 2010 रोजी विष्णुदास भावे नाट्यमंदिरात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड केली. या वर्षापासून पुरस्कारांची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे पुरस्काराची रक्कम पाच हजार ते वीस हजार रुपयांची झाली आहे. एकंदर 1301 पुस्तकातून 83 पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.


Tuesday, November 24, 2009

tags-shivdharma,maratha history,chandrashekhar shikhare