Monday, May 10, 2010

शासनाने मराठा इतिहास संशोधन अकादमी स्थापन करावी



शासनाने मराठा इतिहास संशोधन अकादमी स्थापन करावी
(10-05-2010 : 1:22:04)

पुणे, दि. ९ (प्रतिनिधी) : मराठ्यांच्या खराखुरा इतिहास समोर आणण्यासाठी राज्य शासनाने जागतिक दर्जाच्या मराठा इतिहास संशोधन अकादमीची स्थापना करावी असा ठराव पहिल्या मराठा इतिहास परिषदेमध्ये मंजूर करण्यात आला.पहिल्या मराठा इतिहास परिषदेच्या समारोप प्रसंगी ११ ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, जिल्हाध्यक्ष विकास पासलकर, नगरसेवक चेतन तुपे, वैजयंतीमाला पासलकर, संयोजक राहुल पोकळे, इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे उपस्थित होते.समारोप कार्यक्रमामध्ये मुबंई येथील अरबी समुद्रातील जागतिक शिवस्मारक तातडीने पूर्ण करावे, लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवावा, शिवछत्रपतींच्या सर्व किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, औरंगाबाद विमानतळास राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे, पुण्यामध्ये महत्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करावे, लहुजी वस्ताव साळवे यांच्या नावाने क्रिडा पुरस्कार देण्यात यावा असे ठराव मंजूर करण्यात आले. श्रीमंत कोकाटे यांनी ठरावांचे वाचन केले.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना खेडेकर म्हणाले, '' समोरासमोरच्या लढाया लढणे अशक्य असल्याने लेखणीव्दारे इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. मराठी, इंग्रजी, हिन्दी या भाषांबरोबरच इतर परकीय भाषांचा अभ्यास करून त्या भाषांमध्ये लिहल्या गेलेल्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. त्यातून खरा इतिहास समोर येण्यास मदत होईल.''फुले अकादमीचे कार्यालय उभारावेमहात्मा फुले यांना इतिहास संशोधक म्हणूनही मान्यता काही लोकांनी दिली नाही. त्या महात्मा फुले यांच्या नावाने फुले इतिहास अकादमीची सुरूवात केली जात आहे ही आनंदाची बाब आहे. इतिहास संशोधनामध्ये भरीव कामगिरी करण्याची जबाबदारी फुले इतिहास अकादमीस पार पाडायची आहे. त्याचे हायटेक कार्यालय पुण्यात उभारावे अशी सूचना खेडेकर यांनी केली. तसेच त्याकरीता १ लाख रूपयांचा निधी मराठा सेवा संघाच्या वतीने देत असल्याची घोषणा केली.


No comments: